चाळीसगाव, प्रतिनिधी । माझ्या मैत्रिणीला भेटून परत येते असे सांगून गेलेली तरूणी शहरातून बेपत्ता झाल्याचे प्रकार आज उघडकीस आला असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात हरवल्याचे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पुष्पा शंकरलाल प्राजापत (वय-२० रा. दॅंतडाबाडा, ता. कटडी , जि. भिलवाडा, राज्य राजस्थान) याचे वडील शंकरलाल धन्नालाल प्रजापत हे गेल्या ३० वर्षांपासून चाळीसगावात राहत असून आचारीकाम ते करीत होते. गेल्या ३ महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आई बरदी, बहिण रोहीणी व पुष्पा एकत्रित ह. मु. रथगल्ली चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. पुष्पा प्रजापत हिचे १२ वी चे शिक्षण व डिप्लोमा झाले असून एक वर्षापासून ती घरीच होती. मात्र ४ फेब्रुवारी रोजी आपल्या मुळ गावी (रा. दॅंतडाबाडा, ता. कटडी , जि. भिलवाडा, राज्य राजस्थान) जाण्यासाठी पूर्ण तयारी झालेली असताना. मी माझ्या मैत्रिणीला भेटून येते असे सांगून गेलेल्या पुष्पा प्रजापत ह्या घरी न परतल्याने बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात शोधाशोध केली असता ती कोठेही मिळुन आली नाही. म्हणून हरवल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सावरालाल गिसुलाल प्रजापत (वय-३५) धंदा आचारी याने फिर्याद दाखल केली आहे. पुष्पा हिचा रंग सावळा असून उंची ५ फूट २ इंच आहे. अंगात तिने तपकिरी रंगाचे टाॅप व बदामी रंगाची लगीज पॅन्ट घातली आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान उमाळे हे करीत आहे.