किनगाव येथील बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह विहीरीत आढळला

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने कौटुंबिक वादातून बेपत्ता झाला होता. आज बेपत्ता झालेल्या तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

तुषार गोपाळ राणे (वय-३२) रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी की, किनगाव तालुका यावल येथील रहिवाशी तुषार राणे, आई आशा गोपाळ राणे आणि पत्नी रत्ना तुषार राणे हे वास्तव्याला आहे. तुषार राणे आणि त्याची पत्नी अशा राणे यांच्या कौंटुबिक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे तुषार हा तरूण गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. रविवारी ५ डिसेंबर रोजी तुषार व त्याची आई आशा यांनी सोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री तुषार कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाला. हा प्रकार सोमवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. परिसरात तुषारचा शोध घेतला असता मिळून न आल्याने आई अशा राणे यांनी यावल पोलीसात धाव घेवून माहिती दिली. आशा राणे यांच्या खबरीवरून तुषार राणे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, आज तरूणाचा गावालगत शेतविहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content