दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयवांसाठी नाव नोंदणीचे आवाहन

खामगाव, प्रतिनिधी | दिव्यांग व्यक्तिंनी कृत्रिम अवयवांसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

बुलढाणा जिल्हयातील दिव्यांग व्यक्ति व ज्येष्ठ नागरीकांना कृत्रिम अवयव व आवश्यक सहाय्यक उपकरणे मोफत पुरविणेसाठी शिबिराचे आयोजन करावयाचे आहे. त्यानुसार आवश्यक त्या माहितीसह शहरातील दिव्यांग नागरीकांनी CSC केंद्रावर जाऊन आपले सरकार / alimco.csc-services.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, नोंदणी केल्यानंतर त्याची पावती नगरपरिषद कार्यालयातील जन्म-मृत्यु विभागात जमा करावी. या नोंदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता असणे आवश्यक आहे. तरी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी, नगरपरिषद खामगाव यांनी केले आहे.

 

Protected Content