चाळीसगावातून दुचाकी लंपास

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । शहरातील रघुनंदन कार्यालयात ७/१२ उतारा काढण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची कार्यालयासमोर लावलेली दुचाकी  अज्ञात चोरट्यांनी लंपास केली  शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

 

नानासाहेब सखाराम राखुंडे (वय-६३ रा. जहांगीरदार वाडी ता. चाळीसगाव) हे परिवारासह वरील ठिकाणी वास्तव्यास आहेत. नानासाहेब राखुंडे हे कळमाडू येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.  स्वतःच्या वापरासाठी त्यांनी २०१० साली काळ्या रंगाची डिस्कवर (क्र. एम.एच.१९ ए. ड्ब्लू. २९३८) हि मोटारसायकल विकत घेतली होती. १२ एप्रिलरोजी सकाळी  ७/१२ उतारा काढण्यासाठी ते चाळीसगाव शहरातील रघुनंदन कार्यालयात आले होते. आपल काम आटोपून मुळ जागी परतल्यावर दुचाकी दिसून आले नाही. त्यामुळे घाट रोड, बस स्थानक , रेल्वे स्थानक व इतर ठिकाणी शोधाशोध केली असता  सापडली  नाही.   मोटारसायकल  अज्ञात इसमाने  चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर आज शहर पोलिस ठाण्यात नानासाहेब  राखुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ  विजय शिंदे  करीत आहेत.

Protected Content