जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरातील लक्ष्मीनगरात उभ्या चारचाकी वाहनाची बॅटरी चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील लक्ष्मीनगरात अरबाज खान जमील खान हा तरुण वास्तव्यास आहे. तो राहत असलेल्या परिसरात महाराष्ट्र नावाचे मेडीकल दुकान आहे. या दुकानासमोर रस्त्यावर अरबाज याने ४ फेब्रुवारी रोजी त्याचे चारचाकी वाहन उभे केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वाहनाची बॅटरी दिसली नाही. चोरट्यांनी बॅटरी चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर अरबाज खान याने सोमवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.