चाकूचा धाक दाखवत दोघांना लुटले !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर रेल्वेस्टेशन जवळ 2 जणांना चाकूचा धाक दाखवून खिशातील 7 हजार 800 रुपये जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात सोमवारी 9 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर आधार पाटील (वय,-47, रा. शारदा कॉलनी वड चौक, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शंकर पाटील हे त्यांचे मित्र सोबत अमळनेर रेल्वेस्टेशन जवळ चहा पिण्यासाठी रविवारी 8 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता गेले होते. त्यावेळी चहा पिऊन घरी जाण्यासाठी निघाले असता सुमारास रमण बापू रामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर याने चाकूचा धाक दाखवून खिशातील पैसे दे असे सांगून चाकूने हातावर वार करून जखमी केले व खिशातील 7 हजार 800 रुपयांची रोकड जबरी काढून पळून गेला. या संदर्भात शंकर पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी 9 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता संशयित आरोपी रमण बापू रामदास रा. मुठे चाळ, स्टेशन रोड याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

 

Protected Content