पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात सद्यस्थितीत महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा वारंवार प्रयत्न आर.एस.एस.प्रणित भाजपातर्फे सुरु आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून पाचोरा शहर १४ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
यासंदर्भात शहरातील हुतात्मा स्मारकात ११ डिसेंबर रविवार रोजी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापुरुष सन्मान समिती गठीत करण्यात आली. सदर बैठकीस पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी चळवळीच्या संघटना, कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अनिल लोंढे, सुनिल कदम,संभाजी ब्रिगेडचे मुकेश तुपे, सामाजिक कार्यकर्ते फईम शेख,समता परिषदेचे संतोष महाजन, कन्हैया देवरे, क्षेत्रिय ग्रुपचे पप्पु राजपुत, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वाघ, समीतीचे कार्याअध्यक्ष समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, मा.नगरसेवक विकास पाटील, अझर खान, अशोक मोरे, नगरसेवक आर. पी. आय. चे शशिकांत मोरे, किशोर बागुल, विठ्ठल महाजन, उदय पाटील, सुनिल महाजन, प्रताप पाटील, एकता रिक्षा युनियनचे एकनाथ सदानशिव, सुधाकर महाजन, अनिल सावंत, राजेंद्र राणा, सुनिल भिवसने, जय वाघ, प्रमोद पाटील, जगन्नाथ निकम, अतुल महाजन, उदय पाटील, संजय महाजन महाले, चिंधू मोकळ, संतोष कदम, प्रताप पाटील, सतीश ब्राह्मणे मयूर महाजन, सुनील महाजन, सुनील कदम, ज्येष्ठ मार्गदर्शनपदी खलील देशमुख, सुनील शिंदे धनराज पाटील, अविनाश भालेराव, वासूदेव महाजन, विकास पाटील, भालचंद्र ब्राह्मणे, हरीष आदीवाल व प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, अनिल(आबा) येवले, नंदू शेलकर, प्रमोद पाटील अशा असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी या समितीमध्ये सहभाग नोंदविला असुन १४ डिसेंबर बुधवारी पाचोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाला व्यावसायिक, किराणा दुकाने, कापड दुकाने, मोबाईल दुकाने, सलुन, हार्डवेअर दुकाने यासह अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन महापुरुष सन्मान समिती व सर्व सामाजिक संघटनांतर्फे शहरवासीयांना करण्यात आले आहे.