जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रेणुका महाराजने पटकावला प्रथम क्रमांक

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालय येथील किमान कौशल्य विभागातील इयत्ता बारावीची विद्यार्थींनी रेणुका महाराज हिने जिल्हास्तरावरील हिवाळी क्रिडास्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात चाळीसगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

त्यानिमित्ताने ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.  गिरीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आणि पुढील काळात साठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तीने प्रेरणादायी अनुभव सांगितले. तिला वर्ग शिक्षक भरत गलापूरे,क्रिडा शिक्षक भूषण बोरोले, प्रभारी मुख्याध्यापक ए.एस.पाटील आणि सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तिचे कौतुक, अभिनंदन आणि पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content