घाटकोपरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, 61 रुग्णांचे जीव टांगणीवर

 

मुंबई : वृत्तसंस्था । घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात  ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे  त्यामुळे 61 रुग्णांचे जीव टांगणीवर लागले आहेत. रुग्णालयाची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरु झाली आहे.

 

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात आज सकाळपासून ऑक्सिजनचा साठा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरु आहे. रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला तर ऑक्सिजन पुरवू, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

 

कंपन्या दिवसाला एकदा, दोनदा किंवा रात्रीही ऑक्सिजन पुरवत आहेत. पण ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांकडेही सध्या ऑक्सिजन नाही. आमच्याकडे ऑक्सिजन आलं की आम्ही देऊ, असं ते सांगत आहेत. जेवढे ऑक्सिजन प्रोव्हायडर आहेत त्यांना वेळोवर ऑक्सिजन द्यावा, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. सगळ्या रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडरची समस्या येत आहे. त्यामुळे सरकारने रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडर बसवावा, असं कंपन्यांना सांगावं”, अशी प्रतिक्रिया हिंदू सभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे

 

हिंदू सभा रुग्णालयाकडे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा होता. याबाबत रुग्णालयाने राज्य सरकारला पाठवलेले पत्रही सोशल मीडियावर सकाळपासून व्हायरल झालं होतं. ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची मोठी धमछाक झाली.

 

 

 

 

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नागरीक कोरोनाबाधित होत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना साधा बेड मिळवण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागत आहे. काही ठिकाणी एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार द्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी जमीनीवर रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. काही भागांमध्ये  साठा कमी पडत आहे. त्यामुळे अक्षरक्ष: रुग्णांचा जीव जाताना दिसतोय

Protected Content