घरासमोरून मध्यरात्री वृध्दाची दुचाकी लांबविली

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामकृष्ण नगरातून वृध्दाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नामदेव पितांबर महाजन (वय-६०) रा. लहान माळीवाडा, धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ते त्यांची दुचाकी (एमएच १९ एसी २४०२) ने एरंडोल रोडवरील रामकृष्ण नगर येथे जावई यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी दुजाकी पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून येण्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला दुचाकी न मिळाल्याने अखेर धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाना ठाकरे करीत आहे.

Protected Content