चोरीस गेलेल्या मोपेडसह ४० हजार मूळ मालकाला परत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून चोरीस गेलेल्या मोपेडसह चाळीस हजारांची रोख रक्कम ही मूळ मालकास परत करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे.

शहरातील आठवडे बाजार भागातुन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने स्कुटर व डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये चोरुन नेल्याची घटना १८ जुन रोजी घडली होती. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी सदर चोरीस गेलेल्या स्कुटरचा छडा लावत ती मालकास परत केली आहे.

पाचोरा शहरातील आठवडे बाजार भागातुन गोविंद पुजारी यांची स्कुटर क्रं. एम. एच. २० सी. के. ०२८५ ही व स्कुटरच्या डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये दि. १८ जुन रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. चोरीस गेलेल्या स्कुटरचा पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख व पो. कॉं. योगेश पाटील यांनी शहरात शोध घेतला असता स्कुटर व डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये मिळुन आले.

या अनुषंगाने २४ जुन रोजी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मालकास स्कुटर व ४० हजार रुपये रोख परत केले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, विनोद पाटील, योगेश पाटील, नरेंद्र शिंदे उपस्थित होते. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वास देशमुख व योगेश पाटील यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Protected Content