लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या बॅगेतून तीन तोळे सोन्याची पोत लंपास

Gold Thift

जळगाव प्रतिनिधी । जळगावात लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांच्या बँगेतून तीन तोळे सोन्याची पोत व मोबाईल असा एकुण अंदाजे 1 लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज रामेश्वर कॉलनीत सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात  एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयुर संजय पाटील (वय-25) रा. रामेश्वर कॉलनी येथे आईवडीलांसह राहतो. मयुरची बहिण ज्योती हेमंत साळुंखे ही मुंबईला राहते. रविवारी जळगावाती साई नगरातील बहिणीच्या नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे ज्योती साळुंखे ह्या पती हेमंत साळुंखे सह मुंबईहून जळगावला शनिवारी दुपारी आल्या. सायंकाळी हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री 10 वाजता रामेश्वर कॉलनीतील आईकडे मुक्कामाला आले. रात्री 12 वाजेपर्यंत गप्पा मारल्यानंतर खिडक्या उघडे ठेवून सर्वजण झोपले. रात्री 12 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ज्योती साळुंखे यांच्याबँगेतून अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोन्याची मंगलपोत आणि 3 ग्रॅम मनीमंगळसुत्र आणि चार्जींगला लावलेला मुयर पाटीलचा मोबाईल असा एकुण अंदाजे 1 लाख रूपयांचा ऐवज चोरून नेले. हा प्रकार मुयुरला सकाळी 6 वाजेच्या सुमारास लक्षात आला. याबाबत एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content