लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे (व्हिडीओ)

 

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यासह राज्यात संसर्ग प्रादुर्भाव काळात दुर्दैवाने अनेक कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. अशा एकल निराधार  महिलांना शासन योजनेचे लाभ देण्यात यावेत या मागणी आज लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

कोरोन काळात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने एकल महिलांना शासन स्तरावरून आधार देण्यासाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्याअंतर्गत जिल्हा व तालुका कृतीदल, तसेच मिशन वात्सल्य योजनेंतर्गत निर्देश होऊनही त्याचे कार्य अंत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनही या एकल महिलांना कुटुंबाना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.  या एकल महिलांना विधवा पेन्शन योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा, अंत्योदय योजनेंतर्गत रेशन कार्ड देण्यात यावे, या महिलांना तत्काला ५० हजार रुपये लाभ देण्यात यावा, बालसंगोपन योजनेसह शिवणकाम, शेती, ब्युटी पार्लर, शिवणकाम आदि कौशल्य  असलेल्या महींलाना शासन योजनेचा लाभ देण्यात यावेत आदी मागण्या या निवेदनाद्वारे लोकसंघर्ष मोर्चातर्फे करण्यात आल्या आहेत.  यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

 

Protected Content