भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील एमआयडीसीतील एका कंपनीचे गोडावून फोडून इन्हर्टर, बॅटरी, बांधकामाचे साहित्य आणि शिलाई मशीन असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक उत्तमचंद अग्रवाल वय ३९ रा. गडकरी नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीतील प्लॉट नंर ११ येथे बांधकामाचे किरकोळ काम सुरू होते. ११ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेले इन्हर्टर, बॅटरी, बांधकामाचे साहित्य आणि शिलाई मशीन असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर ठेकदार दिपक अग्रवाल यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुभान तडवी हे करीत आहे.