जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भुषण कॉलनीत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणाच्या खोलीतून ३० हजार रूपये किंमतीच्या महागडा आयफोन चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी अखेर शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथील रहिवशी प्रशिक राजेश थोरात वय २० हा तरूण जळगाव शहरातील भूषण कॉलनी परिसरात वास्तव्याला आहे. १५ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो राहत असलेल्या खोलीच्या खिडकीतून ३० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशिक याने मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहे.