घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवकॉलनीत तरूणाच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याबाबत बुधवार २१ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, विजय यशवंत महाजन (वय-३५) रा. शिवकॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून नोकरीला आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ सीबी ५६५५) घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत १५ हजार रूपये किंमतीच दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर बुधवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.

 

Protected Content