महामार्गावरील अपघातात दुचावरील दोघे जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावरील साईराज हॉटेल समोर झालेल्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू बारकू जोशी वय 48 रा. एकलग्न ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तमाशा मंडळात काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता राजू जोशी हे त्यांचे सहकारी रावसाहेब सुरेश बराडे हे दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ८२५८) एकलग्न येथून जळगाव शहरात जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील साईराज हॉटेल समोर पाठीमागून येणारी कार क्रमांक (एमएच ४१ बीएच ७४९६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील राजू जोशी आणि रावसाहेब बराडे हे दोघे जखमी झाले तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यापासून कारचालक हा कार घेऊन पसार झाला होता. दरम्यान दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलिसात कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Protected Content