जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील अधिकृत सर्व घरगुती महिला कामगारसाठी शासनातर्फे घरेलु कामगार कल्याण्यकार योजना व इतर योजना बंद करण्यात आले आहे. या योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवार १ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाकडून घरगुती महिला कामागरांसाठी कल्याणकारी योजनांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये काही अपघात घडल्यास लाभार्थी महिलेला तात्काळ अर्थसहाय्य केले जातो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थीक मदत केली जाते. लाभार्थी अथवा अवलंबून राहणाऱ्या व्यक्तीला आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे, महिलांच्या प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला अंत्यविधीसाठी खर्चाची रक्कम अदा करणे, महिला कामगारांना जनश्री विमा योजना लागु आहे. अशा अनेक योजनांचा लाभ मिळवू देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना गुरूवार १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता निवेदन देण्यात आले.
मागण्या मान्य कराव्यात अन्यथा जिल्ह्यात घरगुती माहिला कामगारांसोबत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा संघटक जनहीत चेतन अढळकर, ता.अध्यक्ष किशोर नन्नवरे, राजेंद्र निकम, आशिष सपकाळे, विनोद शिंदे, संदीप मांडोळे, गौरव कोळी, शाम पवार, अजय तायडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.