Home क्राईम घटनास्थळी श्वान पथक दाखल; पोलीसांकडून शोध सुरू

घटनास्थळी श्वान पथक दाखल; पोलीसांकडून शोध सुरू


धरणगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातील एकाच रात्री दोन बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना समोर आले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे, जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (वय-७३) यांच्या बंद घराच्या कळी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोटू पाटील हे दोन दिवसांपासून दवाखाना करीता बाहेगावी होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडेराव (वय-३८) हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यांचे घर देखील फोडण्यात आले. परंतू, संदीप खंडेराव यांच्या घरातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि. जिभाऊ पाटील, सहा. फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद, कैलास पाटील, समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound