जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांची ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. शरण खानापुरे, प्रदेश अध्यक्ष डॉ. सचिन राणे यांनी रविवारी १५ जानेवारी रोजी दुपारी १ वाता दिलेल्या एका पत्रकाद्वारे ही निवड जाहीर केलेली आहे.
नितीन विसपुते हे जळगाव जिल्ह्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलेले आहे. हिप्नोथेरपीच्या मदतीने अनेक मानसिक आजार, विद्यार्थ्यांच्या समस्या, व्यसनाधीनता यावर सखोल काम करण्याचा मानस नितीन विसपुते यांनी व्यक्त केला आहे.