ग्राम सुरक्षा दलाच्या सक्रियेतेमुळे तात्काळ गुन्हे शोध कामांना मदत – डॉ. मुंढे

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज अय्युब पटेल | ग्राम सुरक्षा दलाच्या सक्रियेतेमुळे तात्काळ गुन्हे शोध कामांना मदत मिळाली असून, काही गुन्ह्यांचा शोध व तपास लावण्यात यश आल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ते पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांंना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

 

यावल येथील पोलीस स्टेशनच्या वार्षीक तपासणीच्या निमित्ताने पोलीस स्टेशन आवारात आज दुपारी आयोजित पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलच्या संयुक्त मार्गदर्शन बैठकीत पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीत ग्रामसुरक्षा दलाच्या कामाचे विशेष करून प्रशंसा केली. ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांना कायद्दाविषयी माहीती दिली. यावेळी फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content