ग्रामसेवकाचा नाकर्तेपणा; बोढरे गाव दुर्गंधीच्या विळख्यात

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे ह्या गावात गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर शौचालय व दुर्गंधी पसरली असून ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

तालुक्यातील बोढरे ह्या गावात गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर शौचालय व दुर्गंधी भेडसावत असून वेळोवेळी ग्रामसेवक एस.एस.पाटोळे तसेच प्रशासनाला कळवूनही डोळेझाक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. गावातील शासकीय ग्रामपंचायत इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात उघड्यावर सौचालय केला जातो.

 

अशी भयावह स्थिती असतानाही कुठल्याही प्रकारची दखल ग्रामसेवक एस.एस.पाठोळे यांच्याकडून घेतली जात नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामसेवकाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थांचा आरोग्य धोक्यात आला आहे. तसेच बोढरे गावाचा विकास अधोगतीच्या दिशेने होत असल्याचे कारणीभूत ही पाटोळेच असल्याचे. सुरही ग्रामस्थांमध्ये पहायला मिळत आहे.

Protected Content