मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सहा दिवसांपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी यासाठी मुक्ताईनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने महामृत्यूंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले.
अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने त्यांना तीस दिवसांचा कालावधी मागितला होता व तीस दिवस दिवसांच्या आत आरक्षण देणार देणार असे जाहीर केले होते, जरांगे यांनी त्यावेळेस त्यांना ४० दिवसांचा कालावधी दिला व ४० दिवसांच्या आत आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या मराठा समाजासाठी पुन्हा आंदोलन करेल असा इशारा दिला होता.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला चाळीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर जरांगे पाटील साहेबांनी मागील सहा दिवसांपासून पुन्हा उपोषण सुरू केलेले आहे व उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावलेली असून सरकारने त्यांच्या तब्येतीकडे पाहता तात्काळ मराठा आरक्षण जाहीर करून जरांगे साहेबांच्या आंदोलन तात्काळ थांबावे अशी मागणी मराठा समाजातील तरुणांतर्फे करण्यात आली. तसेच त्यांची खालावलेली तब्येत लवकरात लवकर बरी होण्यासाठी मराठा तरुणांतर्फे महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी किशोर बापू गावंडे, जगदीश शेट निकम, किरण महाजन, विकी मराठे, रवींद्र जाधव, सुनील पाटील, डॉ.विवेक सोनवणे, सोपान कळसकर, निलेश पाटील, गुणवंत पाटील, किशोर घटे, मयूर पाटील, सचिन पाटील, चेतन पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते.