यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण बैठक आज यावल येथे पार पडली. यावल तालुक्यातील डांभुर्णी, पिळोदे खुर्द, किनगाव बु॥, मारूळ, भालशिव, अंजाळे गृप, बामणोद, सांगवी खुर्द, निमगाव गृप, भालोद, राजोरे, हिंगोणा, नावरे, दहिगाव, वढोदे प्रगणे यावल, डोणगाव, आडगाव, मोहराळे, कोसगाव , बोरावल बु॥, अट्रावल, वनोली, आमोदे, बोरखेडा बु॥, सांगवी बु॥, पिंपरूड, उंटावद, पिंप्री, विरावली, बोरावल खु॥, नायगाव, सावखेडासिम , टाकरखेडा, कोळवद, वढोदे प्रगणे सावदा, सातोद, वड्री खुर्द, हंबर्डी, मनवेल, कोरपावली, महेलखेडी, कासवे गृप, दुसखेडा, डोंगर कठोरा ,विरोदे, चिंचोली, शिरसाड अशी एकुण ४७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवार दि. २३ डिसेंबरपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. १५ जानेवारीला २१७ मतदान केन्द्रांवर ४६९ भावी ग्रामपंचायतीच्या कारभारींच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. दिनांक १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. आज यावल तहसील कार्यालयात तहसीदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांची निवडणुक प्रकीये संदर्भात प्रशिक्षण व प्रात्यक्षीक मार्गदर्शन संदर्भातील सविस्तर माहीती उपस्थित सर्व अधिकारी वर्गास अवगत करण्यात आली.