गौताळा अभयारण्यात वन्यजीव विभागातर्फे कृत्रिम पाणवठा

चाळीसगाव, प्रतिनिधी । पाटणादेवी शिवापूर बोढरे अभयारण्य भागात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर असून या प्राण्यांना पिण्यासाठी असलेले नैसर्गिक पारंपरिक पाणवठे सद्यस्थिती आटले असल्याने तेथील पाणी नाहीसे झाले आहे. यामुळे वन खात्याच्या वन्यजीव विभागातर्फे अभयारण्यात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे.

गौताळा अभयारण्यातील वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे ते मानवी वस्त्यांकडे स्थलांतरित होतात. असे स्थलांतर होऊ नये या उद्देशाने वनखात्याच्या वन्यजीव विभागाने या अभयारण्य क्षेत्रांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे .यासाठी चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण, आर. बी. शेटे, वनपाल पाटणा डी. एस. जाधव, वनपाल बोडरे, महिला वनरक्षक मनीषा त्रिमाळी तसेच वनमजूर परिश्रम घेत आहेत.

Protected Content