सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रध्वज आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची धरणगाव भाजपातर्फे करण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर तालुक्यातील भोद खुर्द येथील बबलू शेख या इसमाने राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. व्हायरल केलेली पोस्ट आयटी सेक्शननुसार चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. भाजपा आयटी सेलने देखील  या अनुषंगाने एक निवेदन दिले आहे.

यांची होती उपस्थिती


निवेदन देतांना भाजपा नेते पी.सी.आबा पाटील, शिरीष बयस, ॲड. संजय महाजन, ॲड. वसंतराव भोलाने, प्रकाश सोनवणे, चंद्रशेखर पाटील, कैलास माळी, सुनील चौधरी, दिलीप महाजन, टोनी महाजन, कांतीलाल माळी, सचिन पाटील, नगरसेवक ललित येवले, कडू बयस, कन्हैय्या रायपूरकर, हितेश पटेल, अनिल बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content