
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नौदलाच्या एमआयजी २९ के (MiG-29K) या लढावू विमानाला आज सकाळी पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गोव्यामध्ये विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतल्यानंतर आज सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात झाला. या विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. वैमानिक वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला.