जळगाव, प्रतिनिधी | भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी गोदावरी फौंडेशनतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.पंकजा बेंडाळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीमाई यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी श्रुती, वैशाली नेमाने, स्मिता चौधरी, कीर्ती पाटील, स्वीय सहाय्यिका दीक्षा सुरे, कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.