जळगाव, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवशीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्टार प्रमोद भिरूड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडक्शन प्रोग्रामच्या पहिल्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात असलेल्या सर्व शाखाप्रमुख यांची ओळख विद्यार्थी व पालक वर्ग यांना देण्यात आली. जेणेकरून त्यांची महाविद्यालयाशी असलेली नाळ अधिक घट्ट होईल व परस्पर संबंध जोपासले जातील. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांची प्रतिसादाबद्दल प्रशंसा केली व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय सोबत त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल अशा शुभकामना दिल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम व उपक्रम यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी प्रास्ताविक केले. द्वितीय सत्रात प्राध्यापक निलेश चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम तसेच परीक्षेचा पॅटर्न विद्यापीठाचे नियम याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या दिवशी दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात एमआयआर संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल सेशन घेतले. यात त्यांनी जीवनात डिसिजन मेकिंगचे महत्व उलगडून दाखविले. निलेश वाणी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोर्सेची माहिती दिली. विद्यार्थ्याना अशा प्रकारचे कोर्सेस करण्यासंदर्भात आवाहन केले. केले कार्यक्रमाच्या चर्चासत्रात प्राध्यापक विजय चौधरी यांनी प्रेम स्टॉर्मिंग या यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या यांच्या माध्यमातून बुद्धीला चालना देण्यासाठी या सत्रामध्ये मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प विशेष करून भर दिला विद्यार्थ्यांनी असतात खूपच प्रतिसाद दिला यशस्वीतेसाठी प्रथम विभागाचे डॉ. सरोज भोळे, प्रा. ललिता पाटील, प्राध्यापक संजय चौधरी, प्रा. ऋषाली शिंपी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे , अकॅडमी डीन हेमंत इंगळे, उप प्राचार्य प्रा. प्रवीण फालक, प्राचार्य डॉ. विजयकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. दीपाली पाटील व ज्ञानदा कोलते यांनी केले.