यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडासीम यथील पीर गैबनशाह वली बाबा यांच्या उर्स शरीफ निमित्त संदल आणि कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.
सावखेडासीम येथील पीर गैबनशाह वली बाबा हे परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. येथे दरवर्षी उरूसाचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे यात खंड पडला होता. तथापि, यंदा पूर्ण उत्साहात उरूसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सालाबाद प्रमाणे येथे रविवार दिनांक १८ डिसेंबर रविवारी सायंकाळी संदल चा भव्य कार्यक्रम तर १९ रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यानिमित्ताने जळगाव जिल्हा सह मध्य प्रदेशातून येथे हजारो मुस्लिम तडवी समाज बांधव येथे पीर बाबांच्या यात्रोत्सवात सहभागी होणार आहेत. यात्रोत्सव निमित्ताने दिल्ली येथील कव्वालांचे भव्य जंगी मुकाबला आयोजित करण्यात आलेला आहे. आदिवासी बांधवांच्या विवाहसंबंध संदर्भात आदिवासी बांधव आपापल्या मुला मुलींचा विवाह बोलणी करीत असल्याचे प्रथा या समाजामध्ये आहेत ती आजही सुरू आहे. त्या निमित्ताने पीर बाबांच्या दर्ग्याला रोषणाईची चादर चढवण्यात आलेली आहे. संदल निमित्ताने भाविक बांधव पीरगैबन सावली बाबांवर नैवेद्य चढवीत पूजा अर्चना करीत भव्य मिरवणूक काढत असतात. त्यात हजारो बांधवांचा सहभाग असतो.
दरम्यान, या यात्रोत्सवाचा व पिरबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावखेडा सिम येथील हिंदू मुस्लिम पंच कमिटीने केले आहे कव्वालीचे आयोजन करण्यात आले असुन , पंचक्रोशितील सर्व धर्मियांनी दर्गावरील बाबाचे दर्शन व कव्वाली कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.