चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुक्ताईनगरात निषेध (व्हिडीओ)

मुक्ताईनगर – पंकज कपले  | उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज बांधवांतर्फे मुक्ताईनगरात निषेध करण्यात येत असून जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

 

मागील काही काळातील राज्यपाल भगतसिंग कोसारी असो रावसाहेब दानवे असतील श्रीपाद छिंदम असतील सुधांशु त्रिवेदी अशासारखे भाजपाचे बडे नेते यांनी वेळोवेळी बहुजन महापुरुषांचा अपमानकारक वक्तव्य केलेले आहेत. त्यातच आणि त्यापुढेही जाऊन उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी पैठण येथे एका जाहीर कार्यक्रमांमध्ये भाषण करत असताना महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक संस्था आणि शाळा काढण्यासाठी लोकांपुढे भीक मागून शाळा सुरू केलेल्या आहेत, अशा प्रकारचे बेताल व मेंदूमध्ये बिघाड झालेल्या रोगासारखी विकृत पणाचे वक्तव्य केले त्यांच्या बोलण्याची एक लिफी सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे बघितली असता त्यामध्ये त्यांची विकृत देहबोली पाहिलेली आहे आणि तो व्हिडिओ बघत असताना या देशातील विचारवंत असो किंवा समस्त बहुजन समाज या सर्वांच्याच गंभीर भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. या भाजप शासनामध्ये नंगे शाहीचे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत. त्यांनी या देशातील जनतेचे कल्याण करण्यासाठी काहीतरी पावले उचलण्याची गरज असते.

परंतु ही विकृत मानसिकतेचे लोक या पदावर बसल्यानंतर आमच्याच बहुजन महापुरुषांचा वेळोवेळी अपमान जनक वक्तव्य करत असतात यामुळे समस्त बहुजनांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे काम हे गृह खात्याचे आणि पोलीस प्रशासनाचे असून प्रशासनाने प्रशासनाने या लोकांना वेळीच आवर घालने गरजेचे आहे. असेना झाल्यास भविष्यात या देशात अशांतता पसरून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे.. म्हणून समस्त बहुजन समाजातर्फे मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकामध्ये चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सुधाकर बोदडे, मोहन मेढे, रवींद्र बोदडे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे रमेश बोदडे, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक प्रमोद सौंदळे, सचिन झनके, राजू बोदडे, संजय माळी, गणेश माळी, प्रल्हाद माळी, प्रमोद माळी, प्रकाश माळी, ज्ञानेश्वर माळी, किशोर माळी, सुरेश माळी, भूषण वानखेडे, अमर बोदडे, विवेक बोदडे, काँग्रेसचे बि.डी. गवई, निलेश भालेराव, एडवोकेट गौतम इंगळे, राहुल गणेश आणि असंख्य बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content