गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ विरोधात महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे आंदोलन आकाशवाणी चौकात रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजून अनोखे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदिजी नही चाहिये अच्छे दिन लौटा दो हमारे पुराने दिन, मोदी क्या हुआ तेरा वादा आदी घोषणा असलेले फलक आंदोलकांनी आपल्या हातात घेतले होते. गेल्या दोन वर्षातील दरवाढ केंद्र सरकारने या वर्षा दोन वेळा दरवाढ केली, पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने लुट होत आहे. दरवाढीचा त्रास सर्वसामान्य महिलांना जास्ती होतो. कोरोनाच्या काळात सर्व सामान्यांची आर्थिक मंदी असतांना केंद्र सरकारने सामान्य व्यक्तीला
दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तुंमध्ये दरवाढ करून गळचेपी केली आहे. रेशन  दुकानात मिळणारे रॉकेलही ७०/- रूपये लिटर ने मिळते आणि हे ही रॉकेल बंद करण्यात आलेले आहे. गरीब जनतेला गॅस सिलेंडरशिवाय पर्याय नाही, याशिवाय त्यावरील अनुदानही बंद केलेले आहे. तरी ही भाववाढ त्वरीत रद्द व्हावी आणि अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवून मिळावी ह्या संदर्भात राष्ट्रवादी महिला आघाडी ने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, माजी नगरसेविका लता मोरे, डॉ. सुषमा चौधरी, ममता तडवी, शकुंतला धर्माधिकारी, रयसाबी पटेल, गंगुबाई शेळके आदी उपस्थित होते. तसेच या आंदोलनास पाठिंबा दिला होता. यात शिवसेनेच्या सरिता माळी, शोभा चौधरी यांनी देखील सहभाग घेतला होता.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2821885371427928

 

Protected Content