महाविकास आघाडीचे अनेक मंत्री जेलमध्ये जाणार : नारायण राणे

मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील अनेक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. याप्रसंगी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करतांना नवाब मलीक यांना देखील लक्ष्य केले.

 

 

आजच्या पत्रकार परिषदेत नारायण राणे पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे दररोजच्या वापरातील वस्तू हजारो-लाखो रुपयांच्या आहेत, असं म्हणत वस्तूंच्या किंमतीच मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या होत्या. यावरुनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुफानी बॅटिंग केली. लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसर्‍यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला राणेंनी मलिक यांना लगावला.

वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिकांनी वानखेडे ५० हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. याच सगळ्या प्रकरणावर राणेंना प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसर्‍यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला लगावताना कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला.

 

राणे पुढे म्हणाले की, आवाज नाही, धूर नाही असे फटाके आघाडी सरकारचे. धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच मिळतात. कलाबेन डेलकर यांची निशाणी धनुष्यबाण नव्हे तर फलंदाज ही होती. गद्दारी बनून मुख्यमंत्री बनले. केंद्रात धडक मारायची म्हणतात, पण डोकं ठिकाणावर नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी याप्रसंगी केली.

 

Protected Content