जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अहुजा नगर परिसरातील जून्या जकात नाक्याजवळील पंक्चरच्या दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी हवा भरण्याचे कॉम्प्रेसर व कॉईल्स असा एकूण ११ हजारांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हरिविठ्ठल नगरातील बाजार पट्ट्यात राहणार्या महेश भानुदास खोंडे हे वास्तव्यास असून त्यांचे शहरातील अहुजा नगर परिसरातील जकात नाक्याजवळ पंक्चरचे दुकान आहे. ९ ऑक्टाबर ते ११ ऑक्टोबर रोजीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून चोरी केली. या दुकानातून चोरट्यांनी १० हजारांचे हवा भरण्याची कॉम्प्रेसर मशिन, सिलकॉन मोटार व पंक्चर जोडण्याचे कॉईल मशिन असा एकूण ११ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश खांडे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने हे करीत आहे.