गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून रद्द

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या आहेत. २ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या रद्द केल्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

 

दक्षिण मुंबईतील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची पोलीस मुख्यालयात उपायुक्त अभियान या पदावर बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी परिमंडळ ७ चे पोलीस उपयुक्त परमजितसिंग दहिया यांची बदली करण्यात आली होती. सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलीस उपयुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ ७ ची जबाबदारी देण्यात आली होती तर विशेष शाखा-१ चे गणेश शिंदे हे बंदर परिमंडळचे कामकाज पाहतील अशा सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे सायबर आणि सायबरचे उपायुक्त विशाल ठाकूर यांची परिमंडळ ११ येथे बदली करण्यात आली होती. बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

Protected Content