यावल तालुक्यात आज १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण : साकळीत रुग्णसंख्या पोहोचली पन्नासच्यावर

यावल, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्गगाने यावल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या वेगाने शिरकाव केला असून आज मिळालेल्या रुग्णांची संख्याही १८ असून तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या २६१ वर पोहोचली असल्याने सर्वत्र नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात १६१ तर शहरी भागात १०० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यातील १३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून यात ग्रामीण भागातील ७० तर शहरी भागातील ६८ रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत तालुक्यात १७ रुग्ण दगावले आहेत. यात ग्रामीण भागातील ७ तर शहरी भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आज १०६ रुग्ण पॉझिटिव्ह असून यात ग्रामीण भागातील ८४ तर शहरी भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही डोकेदुखी ठरणार असून येणाऱ्या काळात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नसून आरोग्य प्रशासनाने या संकटसमयी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दक्ष व सतर्क राहून शासनाच्या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना आवाहन पुनश्च प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन, डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल आणि फैजपुर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, आज रविवार दि. ५ जुलै रोजी मिळालेल्या तपासणी अहवालात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये साकळी ८ रुग्ण मिळाले असून साकळी गावातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० च्यावर पोहोचलेली आहे. तर पुढील संख्या कोरपवाली २, फैजपूर ४, डांभुर्णी २, म्हैसवाडी २ अशी एकूण १८ कोरोना बाधित रुग्ण आज तालुक्यात आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतं असल्याने ही संख्या २६१ वर जाऊन पोहोचली आहे.

 

यावल तालुक्यातील गावांनुसार रुग्ण संख्या

दहिगाव ४, कोरपावली ५, सतोड १, आमोदा २, चिंचोली १, चुंचाळे ४, बोरावलं २, भालोद ९, अट्रावल १२, संघवी १, चितोड १, पाडळसा ३, न्हावी ७, हिंगोणा १, कोलवड ४,नायगाव १, किनगाव खुर्द १, किनगाव ब्रुद्रुक १, डोंगरकोठोरा १, माहीसवाडी १७, सकाळी ५७+ ८, पिम्प्रुडं ५, चुंचाळे २, मनवेल ४, डांभुर्णी ५, हांबर्डी १

फैजपूर नागरपालिकेअंतर्गत एकूण ५८ रुग्ण आढळले असून ३६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १८ रुग्ण उपचार घेत आहेत.

Protected Content