विरावली येथील ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३वी जयंती निमित्त विरावली ग्रामपंचायतच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावल तालुक्यातील विरावली येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचारांनी, कार्यांनी व कर्तुत्वाने राज्य केले अशा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावाच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच कलीमा तडवी, उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे सर्मथक व विरावली गावाचे माजी सरपंच तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील, ईश्वर पाटील, विरवली गावाचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य नथू अडकमोल सिद्धार्थ अडकमोल, माधव निळे, कैलास उखा पाटील, भूषण संजय अडकमोल, अजय आप्पा साळुंखे,सुवर्ण मिलिंद अडकमोल आणि विरावली गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Protected Content