गुलाबरावजी देवकर अभियांत्रिकीतर्फे मतदार जनजागृती रॅली

जळगाव (प्रतिनिधी) मतदार राजा जागा हो .. लोकशाहीच्या धागा हो.. , एकच लक्ष मतदानाच्या हक्क.. अशा विविध घोषणा देत श्री गुलाबरावजी देवकर अभियांत्रीकी व तंत्रनिकेतन , व्यवस्थान शास्त्र, डी. फॉर्मसी, बी. फॉर्मसी , आर्कीटेक्चर ,कनिष्ठ महाविदयालय या सर्वच शाखांच्या विद्यार्थानी जळगाव शहरातून आज मतदार जनजागृती रॅली मोठया उत्साहात काढली.

प्रारंभी आकाशवाणी चौकातील जिल्हा मजूर फेडरेशन जवळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या हस्ते प्रफूल्ल देवकर, संचालक डॉ. विकास निकमसह ईतर मान्यंवर व प्राध्यापक वृंदाच्या उपस्थितीत या मतदार जनजागृती रॅलीस सुरुवात झाली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय , बस स्थानक, स्टेडीयम कॉम्पप्लेक्स मार्गे कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळया पंर्यत नेण्यात आली. या वेळी सर्वानी मतदाना विषयी प्रतिज्ञा घेवून मतदाना विषयी जास्तीत – जास्त जनजागृती करण्याचे आवाहन करत सामुहिक राष्ट्रगीताने या रॅलीच्या समारोप झाला. या रॅलीत अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.ए.जे. पाटील , उपप्राचार्य सी.एस. पाटील , तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.एम .पी. पाटील , डि. फॉर्मसीचे प्राचार्य प्रा. नितीन पाटील , बी फॉर्मसीचे प्राचार्य प्रा.श्री पवार , आर्किटेक्चरचे प्रा. व्हि.एन. चौधरी , कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.एस.आर. पाटील , व्यवस्थापन शास्त्राचे मोनाली नेवे , प्रज्ञा सोनवणे यांच्यासह सर्वच शाखांचे प्राध्यापक वृंद व विदयार्थी व विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थितीत होते. या रॅलीचे उकृष्ठ नियोजन प्राध्यापक वृंदाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी सौरंभ देसले, विनोद बुवा, माधुरी पाटील व श्री. झोपे यांनी उकृष्ठरित्या सांभाळले.

Add Comment

Protected Content