गुरूपौर्णिमानिमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी गुरुपौर्णिमेनिमित्त बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. करुणा सपकाळे होते तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे कला शाखेचे समन्वयक प्रा उमेश पाटील हे होते.

 

सुरुवातीला स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व गुरुवर्यांचा गौरव केला. समर्थ पाटील या विद्यार्थ्याने ‘ओंकार स्वरूपा’ हे गीत गायन करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले. नेहल चौधरी ह्या विद्यार्थीनीने गुरुंचे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्व आहे असे सांगितले. तर जान्हवी पिंगळे व सृष्टि साठे ह्या विद्यार्थीनींनी  गुरूंमुळे शिष्याचे जीवन अपुर्ण आहे असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा उमेश पाटील यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व याबद्दल माहिती दिली . प्रा संध्या महाजन यांनी गुरुंच्या अध्यापन व संस्कारातून शिष्य हा जीवनात घडत असतो असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा करुणा सपकाळे यांनी अध्यापन हे गुरुंचे कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाची साधना करावी असे प्रतिपादीत केले.

 

या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गीता पंडित या विद्यार्थीनीने केले. या कार्यक्रमावेळी कला शाखेचे प्रा गणेश सुर्यवंशी, प्रा अर्जुन मेटे, प्रा योगेश धनगर,प्रा इशा वडोदकर, प्रा सुर्यकांत बोईनवाड , प्रा संध्या महाजन, प्रा कोळी  व कला शाखेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Protected Content