गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना तीन दिवसांपासून ताप होता. त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.
शंकरसिंग वाघेला यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. शंकरसिंह वाघेला यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. ज्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांना सध्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण असलेल्या अनेक रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. त्यातून कदाचित त्यांना करोनाची लागण झाली असावी असेही पटेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 5 लाख 29 हजार 421 वर गेली आहे.