जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम ; घरोघरी जाऊन केले शालेय पुस्तकांचे वाटप

पहूर , ता. जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरोघर जाऊन अभ्यास करण्यासाठी शालेय पुस्तकांचे वाटप केले.

शिक्षकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालक- विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन आरोग्याची काळजी घेण्याविषयी तसेच नियमित अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. दीर्घ कालावधीनंतर शाळेतील गुरुजी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नवीन पुस्तके पाहून चिमुकले विद्यार्थी आनंदून गेले. याप्रसंगी पिंपळगाव बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापिका शारदा शिंपी, विजया अहिरे, ज्योती पाटील, विशाल ढगे, अनिल महानोर व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जामनेर तालुका अध्यक्ष, संतोष पांढरे आदी उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले . विद्यार्थी हित लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळेने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.

Protected Content