Home राजकीय गिरीश महाजनांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा

गिरीश महाजनांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा

0
58

पुणे प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत विजय मिळवण्याचा दावा केल्याच्या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा दिला आहे.

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी अलीकडेच बारामतीतही विजय मिळवण्याचा दावा केला होता. यावर अजित पवार यांनी त्यांना बारामतीत निवडणूक लढून दाखविण्याचे आव्हान दिले होते. तर गिरीश महाजन यांनी बारामती नगरपालिकेत विजय संपादन करणार असल्याचे सांगत हे आव्हान स्वीकारले होते. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी रूपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, ”महाजन,दारूच्या बाटल्यांना बायकांची नावं द्या म्हणजे खप वाढेल…हे आपलंच वक्तव्य ना. महाराष्ट्रातील मायमाऊली विसरल्या नाहीत आपली कर्तृत्व अजुन. सत्तेत आहे म्हणुन माजलात;सत्ता जाईलच त्यावेळेस रस्त्यावरून चालुन दाखवा. नाही डांबर फासलं थोबाडाला तर बघ.”

दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी अतिशय आक्रमक पध्दतीत गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्यामुळे हे प्रकरण अजून चिघळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. रूपाली चाकणकर यांची ही पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाली असून यावरून मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू आहे. भाजपतर्फे यावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे जळगावातही याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी पक्ष कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत पदाधिकार्‍यांनी मंत्री महाजन यांना बारामतीचा आदर्श घेण्याचाही सल्ला दिला. महानगर अध्यक्ष नामदेवराव चौधरी, प्रवक्ता सलिम ईनामदार, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, युवकचे पदाधिकारी उज्ज्वल पाटील, दुर्गेश पाटील, अरविंद मानकरी, महिला महानगर अध्यक्षा नीला चौधरी, भरत कर्डिले उपस्थित होते.

ही आहे रूपाली चाकणकर यांची पोस्ट.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound