गिरडगाव ते चुंचाळे व शिरसाड ते पिळोदे दरम्यान रस्ता दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील गिरडगाव ते चुंचाळे व शिरसाड ते पिळोदे दरम्यान रस्त्या दुरूस्तीच्या कामाला आज रविवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर आणि आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामांचे आज रविवार ३ ऑक्टोबर रोजी चोपडा विधानसभा क्षेत्रातील शिरसाड ते पिळोदे गावापर्यंत सुमारे ३ किलो रस्ता मजबुतीकरण खर्च १ कोटी ५० लाख रुपये आणि बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील गिरडगाव ते चुंचाळे गाव फाट्यापर्यंत ५ किलोमिटर पर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण खर्च पाच कोटी रुपये या कामांचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर, आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, यावल कृउबा समितीचे सभापती तुषार पाटील, गोटू सोनवणे, पिळोदा गावाचे सरपंच मनोहर पाटील, माजी उपसभापती भारसिंग बारेला, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, संतोष खर्चे, शरद कोळी, महेंद्र चौधरी, गोकुळ कोळी, संतोष महाजन,  योगेश कोळी, प्रकाश कोळी, अनिल कोळी, चंद्रशेखर साळुंखे, उदयभान पाटील, धनराज पाटील यांच्यासह विविध गावातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते.

 

Protected Content