Home धर्म-समाज यावल येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे प्रवचन

यावल येथे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचे प्रवचन

0
61

यावल, प्रतिनिधी | यावल येथील हरिओम नगरात जय हनुमान धर्म संस्कार सोहळा होणार आहे. यात श्री श्री १oo८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रवचन संपन्न होणार आहे.

 

श्री क्षेत्र वेरुळ ता. रत्नपुर खुलताबाद जि. संभाजीनगर येथे जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणार्थ जय हनुमान धर्म संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. दि.8 ते १५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात भक्त फेरी निमित्त जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १oo८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.

गुरुवार, दिनांक २५ रोजी दुपारी चार वाजता यावल येथे फैजपूर रोडावरील हरिओम नगर येथे या प्रवचनाचचे आयोजन करण्यात आले आहे. यावल तालुका व पंचक्रोशीतील भाविकांनी या प्रवचनाचालाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवार व्यास नगरीतील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound