पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे गायत्री परिवाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्षारोपण करण्यात येवून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली.
गायत्री परिवारातर्फे नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळालेले रोपं बालाजी सिटी वंजारी रोड नवीन हायवे बायपास जवळ लावण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी जनसेवक पी.जी. पाटील यांनी सांगितले की, गायत्री परिवार धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असतांना सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करत आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी वृक्षारोपण त्याचे संगोपन करून टोलेजंग असे झाड वाढवून तो परिसर हिरवागार केला. आज अखेर राहिलेला परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संगोपनाची जबाबदारी त्या परिसरातील रहिवासी जितेंद्र पाटील शेवगेकर सपत्नीक व गायत्री परिवाराने संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येकाने एक झाड स्वतःसाठी आपण आपल्या अंगणात किंवा परिसरात लावून आपले परवा शहर हिरवेगार करण्याचा आपण प्रयत्न करूया असे चांगले उपक्रम गायत्री परिवाराने राबवावे हीच अपेक्षा केल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पी. जी. पाटील, जितेंद्र पाटील शेवगेकर, माधवराव शिंपी, गणेश शिंपी, योगेश मैंद, रमेश मालपुरे, महेंद्र भावसार, प्रशांत येवले, बापू शिंपी, गणेश क्षेत्रीय आदी मान्यवर उपस्थित होते.