घरपट्टी वाढ विरोधी संघर्ष समिती ३ दिवसीय ठिय्या आंदोलनचां इशारा

WhatsApp Image 2019 12 24 at 8.29.03 PM

चोपडा, प्रतिनिधी | येथे नगरपरिषद समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने शहरातील झोपडपट्ट्या ते कॉलनीतील मालमत्ता इमलेधारक यांच्या घरपट्टी व तदर्थ कर वाढ व व्याजाच्या आकारणी विरुद्ध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी इशारा धरणे आंदोलन करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले नगर, पाटील गढी, मल्हार पूरा, बडगुजर गल्ली, धनगर आळी, भागातील लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अमृत महाजन यांनी केले. दरम्यान चोपडा नगरपालिकेचे प्रतोद नगरसेवक जीवन चौधरी यांना ७. मागण्याचे निवेदन देणेत आले. त्यात फडणवीस सरकारच्या ज्या परिपत्रकाने जुलमी वाढ करण्यात आली ते परिपत्रक च रद्द करा. नगसेवकांनी खास सभा घेऊन या प्रश्न गंभीर चर्चा करून निर्णय घ्यावा. तोवरमागील दरांने कर वसुली सुरू ठेवावी. महात्मा फुले नगरमधील हरकती सुरू असलेल्या ४ वर्षापासून हरकतींचा निपटारा करण्यात यावा. व्याज दरकपात करा. कॉलनी परिसरात सोई सुधारणा करा. निराधार विधवा, दिव्यांग, परित्यक्ता यांना घरपट्टी कर असू नयेत आदी मागण्यां चा समावेश होता. उप नगराध्यक्ष व हितेश देशमुख यांनी केलेल्या चर्चेतून नगर परिषद बैठकीत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन नगराद्यक्ष चे वतीने देणेत आले. येत्या १५ ते १७ जानेवारी या तीन दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉ. महाजन यांनी दिला. या आंदोलनासाठी एक समिती गठीत करण्यात आली निमंत्रक अमृत महाजन, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाठ, सचिव पांडुरंग सखाराम महाजन; भानुदास महाजन ; प्रकाश माळी, प्रकाश लोहार, भूषण पाटील, शौकत अली महम्मद अली, शेख रफिक, कल्पना धनगर, दिनेश पाटील, रवींद्र माळी, सुमनबाई पाटील, आनंद विसावे यांचा समावेश आहे.

Protected Content