जळगाव, प्रतिनिधी । काल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा गांधी घराण्या व्यतिरिक्त नियुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असता एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
गांधी घराण्याच्या इतिहासाचा विसर या वरिष्ठ नेत्यांना पडलेला असावा व त्यामुळेच त्यांनी गांधी घराण्यावर ती अविश्वास दाखवत अशाप्रकारचे निंदनीय मागणी पत्राद्वारेएनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे. केली.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. मराठे यांनी निषेध व्यक्त केला. गांधी घराण्यांवर अविश्वास दाखविणारे पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक व मिलिंद देवरा यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा काँग्रे-स पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.