Home आरोग्य कोरोना मृतांच्या वारसाला सरकारी मदतीची मागणी ; सुप्रीम कोर्ट तटस्थ

कोरोना मृतांच्या वारसाला सरकारी मदतीची मागणी ; सुप्रीम कोर्ट तटस्थ

0
49

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत देण्याच्या याचिकेवर मार्गदर्शक सूचना देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्येतही मोठी भर पडत चालली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.


Protected Content

Play sound