‘बालविश्व’ शाळेत वाजत गाजत ‘श्रीं’ची स्थापना (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 02 at 3.14.34 PM

जळगाव प्रतिनिधी | येथील दादावाडी परिसरातील सद्गुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविश्व प्राथमिक शाळा व बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे गणेश चतुर्थी निमित्ताने गणेशाची स्थापना करण्यात आली.

सजविलेल्या गाडीवरती गणेशाची मृर्ती ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. ढोल ताशाच्या गजरात गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. शाळेचे गणेश स्थापनेचे हे ७ वे वर्ष आहे. ही मिरवणूक गुजराल पेट्रोल पंप मार्गाने दादावाडी जैन मंदिर परिसर मार्गाने शाळेत दाखल झाली. या मिरवणुकीत शाळेच्या संचालिका भारती चौधरी, अध्यक्ष संदीप चौधरी तसेच पी. पी. चौधरी,  अॅड. टी. एन. बोरोले व समन्वयिका प्रतिभा भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

 

 

Protected Content