काँग्रेस अध्यक्षपदावरून मुक्त करा – सोनिया गांधी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलवण्यात आली. ही बैठक सध्या सुरू असून, सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकारी समितीकडे केली आहे.

या पत्रानं काँग्रेस नेतृत्वाचा प्रश्न प्रकर्षानं मांडण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यसमितीची बैठक होत आहे. बैठकीच्या सुरूवातीलाच सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे दिलं. त्याचबरोबर “आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं”, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली.

अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या मागणीबरोबरच सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सूचनाही काँग्रेस नेत्यांना केली

Protected Content